शिवम दुबे युवा खेळाडूंना करणार आर्थिक मदत   

चेन्नई : भारताचा खेळाडू शिवम दुबे याने मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या १० खेळाडूंना आर्थिक मदतीची घोषणा त्याने केली. भारताचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करणार्‍या शिवम दुबेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवम दुबे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईच्या क्रिकेट संघाकडून खेळतो. शिवम दुबे याने स्वत:च्या कमाईतून युवा खेळाडूंच्या भविष्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवम दुबे सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. शिवम दुबेने तामिळनाडूच्या १० युवा खेळाडूंना प्रत्येकी ७० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
 
शिवम दुबे याने तामिळनाडू स्पोर्टस जनर्र्लिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार आणि स्कॉलरशिप सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली. शिवम दुबे प्रत्येकी ७० हजारांची मदत १० खेळाडूंना करेल. टीएनएसजेएकडून या १० खेळाडूंना ३० हजार रुपयांची मदत करेल. म्हणजे त्या खेळाडूंना १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल. शिवम दुबेने ज्या खेळाडूंना मदत करण्याचा निर्णय घेतला ते टेबल टेनिस, आर्चरी, पॅरा अ‍ॅथलिटस, स्क्वाश, क्रिकेट, क्रिकेट, सर्फिंग, अ‍ॅथलिटस, बुद्धिबळ हे खेळ खेळतात. पीबी अभिनंध (टेनिस), केएस व्हेनिसा श्री (आर्चरी), मुथुमीना वेल्लासामी (पॅरा अ‍ॅथलिटस), शमीना रियाझ (स्क्वाश), जयंत आरके (क्रिकेट), एस. नंधना (क्रिकेट), कमाली (सर्फिंग), आर. अभिन्या, आसी जिथीन अर्जुनन (अ‍ॅथलिटस), ए टक्कशांथ (बुद्धिबळ)

Related Articles